अभिनेता अशोक सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटासह, नाटक, मालिका, हिंदी चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचे अनेक अभिनय हे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. दरम्यान कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला.