Shubhankar Ekbote: अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं शाही व्याहीभोजन, 'या' अभिनेत्रींसोबत अडकणार लग्नबंधनात

अश्विनी यांचा मुलगा शुभंकर (Shubhankar ekbote) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अमृता बने (Amruta bane) या अभिनेत्री सोबत त्याचं लग्न ठरलंय.
अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं शाही व्याहीभोजन
shubhankar ekboteesakal
Updated on

Shubhankar Ekbote And Amruta Bane: मराठी इंडस्ट्रीत आजही ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे (Ashwini Ekbote). या गुणी अभिनेत्रीच्या अकाली एक्झिटने सगळ्यांनाच धक्का बसला. अश्विनी यांचा मुलगा शुभंकर (Shubhankar ekbote) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अमृता बने (Amruta bane) या अभिनेत्री सोबत त्याचं लग्न ठरलंय.

शुभंकर आणि अमृताच्या व्याही भोजनाचा कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. सोशल मीडियावर शुभंकरने त्याच्या व्याही भोजनाचे फोटोज शेअर केले आहेत. 6 एप्रिल 2024 ला त्यांचा हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. या फोटोजना शुभंकरने "अशी ही व्याहीशाही" असं कॅप्शन दिलं आहे.

निळ्या रंगाची काठपदाराची साडी अमृताने नेसली होती तर शुभंकरने कुर्ता, पायजमा आणि टोपी असा लूक केला होता. त्यांनी हातात नवरदेव, नवराई लिहिलेले पोस्टर्स घेऊन काढलेल्या फोटोजनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

नोव्हेंबर 2023ला या जोडीचा साखरपुडा थाटात पार पडला. सन मराठीवरील 'असे हे कन्यादान' या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली आणि हळूहळू हे दोघेही प्रेमात पडले.

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं शाही व्याहीभोजन
Entertainment News: शिवानी पाठोपाठ 'या' दोन जोड्यांनी उरकला साखरपुडा, यातील एका अभिनेत्याची होणारी बायको आहे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर

शुभंकरने आजवर अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. धर्मवीर, चौक हे काही त्याचे गाजलेले सिनेमे आहेत. तर अमृताने न्यूज अँकर म्हणून करिअरला सुरुवात केली त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात प्रवेश करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com