अथर्व सुदामेला पीएमपीएलचा दणका, 50 हजारांचा दंड भरावा लागणार, बसमध्ये रिल करणं भोवलं

PUNE PMPML TAKES ACTION AGAINST INFLUENCER ATHARVA SUDAME: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपीएल बसमध्ये विनापरवानगी रिल बनवणं रिलस्टार अथर्व सुदामेला चांगलंच महागात पडलं आहे. याआधी रिल हटवण्याची नोटीस देऊनही अथर्वने ती न काढल्याने कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
PMPML takes action on viral Instagram reel

PMPML takes action on viral Instagram reel


esakal

Updated on

Atharva Sudame fined for PMPML bus reel: पुण्यातील पीएमपीएल बसमध्ये रिल बनवणं अथर्व सुदामेला चांगलंच भोवलं आहे. रिलस्टार अथर्ववर पीएमपीएल बसमध्ये विनापरवानगी रिल्स बनवल्याप्रकरणी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. तसंच दंड जमा न केल्यास प्रशासनाकडून त्याला नोटीस पाठवण्यात आलीय. कोणतीही परवानगी न घेता पीएमपीएलच्या बसमध्ये रील बनवणं. तसंच महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्लाचा वापर केल्यामुळे अथर्व सुदामेवर कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com