
Pushpa 2 Film Screening : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा 2 सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. या सिनेमासाठी लोक थिएटरबाहेर गर्दी करत आहेत. पहिल्या दोन दिवसातच या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसातच सिनेमाने 150 कोटींचा आकडा गाठला असून लवकरच 200 कोटींची कमाई हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्ण करणार आहे. सिनेमाची यशस्वी घौडदौड सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आलीये.