
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली मालिका म्हणजे इंद्रायणी. एका लहान मुलीचा कीर्तनकार बनण्याचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळाला. एका महिन्यापूर्वी या मालिकेत लीप आला. इंदू आणि तिची सगळी मित्र-मंडळी मोठी झाल्याचं दाखवण्यात आलं. मालिकेच्या कथानकात अनेक बदल झाले त्यातच आता आगामी भागांमध्ये काय बघायला मिळणार याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधत मेकर्सवर टीका केलीये.