
Marathi Entertainment News : सध्या मराठी वाहिन्यांची हिंदी वाहिन्यांशी चढाओढ करण्याची स्पर्धा रंगलीय. असं म्हणण्याचं कारण कि, हिंदी वाहिन्यांमध्ये लोकप्रिय ठरलेला दोन मालिकांच्या एकत्रित एपिसोडचा फॉरमॅट आता मराठी मालिकांमध्येही गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहेत. झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्या या महासंगम एपिसोडमध्ये अग्रेसर आहेत. त्यातच आता झी मराठीवरील नवीन महासंगम विशेष भागाची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतेय.