अवधूत गुप्तेंच्या ‘ आई’ अल्बममधील ‘तू नसशील तर’ भावस्पर्शी गाणे प्रदर्शित

Avadhoot Gupte New Song : गायक अवधूत गुप्तेच्या आई या अल्बममधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या नवीन गाण्याविषयी.
Avadhoot Gupte New Song
Avadhoot Gupte New Song
Updated on

Marathi Entertainment News : आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या भावस्पर्शी गीताचे शब्द लिहिले आहेत समीर सामंत यांनी व संगीत संयोजनाची जबाबदारी अनुराग गोडबोले यांनी सांभाळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com