Avengers Doomsday Ticket Price : एका तिकिटाची किंमत तब्बल ४००० रुपये! नवी मुंबईच्या थिएटरमध्ये हॉलिवूड चित्रपटाचा नवा विक्रम; पाहा काय आहे खास?

सिनेपोलिस सीवूड्समध्ये मध्यरात्रीच्या 4DX शोला तुफान प्रतिसाद; प्रदर्शनाआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग १० कोटींच्या पार
Price of single ticket for Avengers: Doomsday movie is Rs 4,000.

Price of single ticket for Avengers: Doomsday movie is Rs 4,000.

Sakal

Updated on: 

हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित 'अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे' (Avengers: Doomsday) या चित्रपटाची भारतीय प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट भारतात १७ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रदर्शनाच्या तब्बल एक महिना आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील नेरूळ येथील प्रसिद्ध सिनेपोलिस नेक्सस सीवूड्स (Cinepolis Nexus Seawoods) मल्टिप्लेक्समध्ये १७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२:०१ वाजताच्या पहिल्या 4DX 3D शोच्या एका तिकिटाची किंमत तब्बल ४००० रुपये ठेवण्यात आली आहे. बुकिंग शुल्कासह ही रक्कम सुमारे ४,०७० रुपयांच्या घरात जात असल्याचे नमूद केले आहे.

Loading content, please wait...