एकेकाळी जीवाला जीव देणारे भाऊ झाले एकमेकांचे वैरी; 'बंधू' चित्रपट पाहावा की नाही? वाचा रिव्ह्यू

BANDHU MARATHI MOVIE REVIEW: उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बंधू' हा मराठी चित्रपट दोन सख्ख्या भावांच्या नात्याची, प्रेमाची आणि संघर्षाची गोष्ट सांगतो.
BANDHU MARATHI MOVIE REVIEW

BANDHU MARATHI MOVIE REVIEW

esakal

Updated on: 

UPENDRA LIMAYE JITENDRA JOSHI BANDHU MOVIE: आपल्या समाजामध्ये काही नाती ही रक्ताची असतात आणि त्यांना खूप मनापासून जपावे लागते. कारण ही नाती जन्मतःच आपल्याला मिळत असतात. अशाच नात्यापैकी एक नाते म्हणजे भावांचे. आपला मोठा किंवा छोटा भाऊ कितीही दूर असला किंवा जवळ असला की त्याचा आपल्याला एक आधार आणि पाठिंबा असतो. मनाने आणि विश्वासाने तो आपल्या जवळ असतो. आपल्या सुख आणि दुःखामध्ये तो सहभागी होत असतो. लहानपणी कितीही एकमेकांशी भांडलो.. चेष्टामस्करी केली किंवा रुसवे-फुगवे असले तरी भावाचं नातं हे घट्ट असतं. अशाच दोन भावांची हृदयस्पर्शी कहाणी म्हणजे बंधू हा चित्रपट.

Loading content, please wait...