
मराठमोळे अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांनी चित्रपटांसोबतच मराठी रंगभूमी देखील गाजवलीये. आपल्याला चित्रपटांपेक्षा जास्त मजा ही नाटक करताना येते असं ते सांगतात. काही वर्षांपूर्वी भरत जाधव यांनी मुंबई सोडली आणि कोल्हापूरला शिफ्ट झाले. इथे त्यांनी टुमदार घर बांधलंय. आजूबाजूला मोठीशी बाग आहे. शेत आहे. तिथे त्यांनी अनेक झाडं देखील लावली आहेत. आज भरत यशाच्या शिखरावर आहेत. यासाठी त्यांनी मेहनत केलीये मात्र आपल्या यशात आपल्या पत्नीचा वाटा आहे हे सांगायला ते विसरत नाहीत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्नीचा एक किस्सा सांगितलाय.