
Marathi Entertainment News : परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. लवकरच रिलीज होणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे 'बंजारा' हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे.