भरत जाधव हे रंगमंचावर प्रयोग करत होते. त्यांनी अचानक हा प्रयोग थांबवला. नेमकं काय म्हणाले भरत जाधव .आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यांच्या विनोदी भूमिका या प्रेक्षकांमध्ये विशेष गाजल्या. भरत गेली कित्येक वर्ष नाटकांमधून आणि चित्रपटांमधून मराठी सिनेसृष्टीवर राज्य करतोय. त्याचं चित्रपटांइतकेच त्याच्या नाटकाचे शो हाऊसफुल असतात. त्याची अनेक नाटकं प्रेक्षकांची आवडती आहेत. त्यातील एक नाटक म्हणजे 'श्रीमंत दामोदरपंत'. या नाटकाला तर प्रत्येक ठिकाणी हाऊसफुलची पाटी पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात नाट्यगृहाची अवस्था फारशी बरी नाही. त्याचाच फटका भरत यांच्या नाटकाला बसला आणि त्यांनी अर्ध्यातच नाटक थांबवलं. .गेल्या रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात 'श्रीमंत दामोदरपंत' नाटकाचा प्रयोग झाला. नाटक रंगात आलेलं असताना अचानक अभिनेता भरत याने नाटक मध्येच थांबवलं. नाटक सुरू होऊन तासभर झाला असताना त्याने अचानक नाटक थांबवलं. त्याचं कारण म्हणजे नाट्यगृहात आलेले कीटक. रंगमंचावरील प्रखर प्रकाशझोताच्या दिशेने हजारो कीटक आकर्षित झाले. हे कीटक इतक्या प्रमाणात आले की कलाकारांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होऊ लागला. भरतला रंगमंचावर काम करताना त्रास होऊ लागला. यामुळे शेवटी नाईलाजाने भरतने प्रयोग थांबवला. .भरतने तिथे जमलेल्या प्रेक्षकांना शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली. आणि काहीवेळासाठी नाटक थांबवण्यात आलं. रंगमंचावर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आणि कीटक कमी होईपर्यंत नाटक थांबण्यात आलं. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात येताच नाटक पुन्हा सुरू करण्यात आलं. या सगळ्या प्रसंगानंतरही प्रेक्षकांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवत कलाकारांना भरभरून दाद दिली. नाटक पुन्हा सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला. .प्रेक्षकगृहात गैरसोय असल्यामुळे कलाकारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्यांच्या तब्येतीवर आणि पुढील कार्यक्रमावर देखील परिणाम होतो. यापूर्वी अशा अनेक नाट्यगृहाच्या तक्रारी कलाकारांनी केल्या आहेत. मात्र त्यांच्यात फारशी सुधारणा झालेली नाही. .Frequently Asked Questions.भरत जाधव यांचं सर्वाधिक लोकप्रिय ठरलेलं नाटक कोणतं?.'मोरूची मावशी', 'श्रीमंत दामोदरपंत' ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली आहेत.भरत जाधव यांचा शेवटचा चित्रपट कोणता?.भरत जाधव हे नुकतेच 'आता थांबायचं नाय' या चित्रपटात दिसले होते. .भरत जाधव यांचं घर कुठे आहे?.भरत जाधव यांनी कोल्हापूरमध्ये घर बांधलं आहे. .भरत जाधव यांनी मुंबई का सोडली?.आई- वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी मुंबई सोडली आणि कोल्हापूरला राहायला गेले. .घर साफ करताना तेजस्विनीला सापडलं वडिलांचं पत्र; पित्याच्या निधनानंतर त्यांनी घेतलेली उधारी द्यायला गेली तेव्हा त्या मित्राने... .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.