Bharti Singh Announces Second Pregnancy with Harsh Limbachiyaa:
esakal
आपल्या विनोदी स्वभावातून सगळ्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री भारती सिंग नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता भारतीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सर्वांची लाडकी लाफ्टर क्वीन पुन्हा आई होणार आहे.