BHAU KADAM AND NILESH SABLE’S RETURN
esakal
Bhau Kadam–Nilesh Sable Reunite : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात भाऊ कदम आणि निलेश साबळे यांची जोडी प्रचंड गाजली होती. निलेश साबळेंचं सूत्रसंचलन आणि त्याला मिळालेली तकडी सहकलारांची साथ, त्यातल्या त्यात भाऊ कदमचा हटके अंदाज यामुळे चला हवा येऊ द्या कार्यक्रम चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. गेल्या काही दिवसापासून 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व सुरु झालं आहे. या पर्वात भाऊ कदम आणि निलेश साबळे नसल्यानं अनेकांना धक्का बसला होता. परंतु आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.