Bhavana Finally Confesses Love to Siddhu in 'Lakshmi Niwas
esakal
लक्ष्मी निवास मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या जान्हवीला जयंतचं सत्य कळालं आहे. तर गुंडाच्या तावडून भावना सिद्धूला सोडून आणते. भावना जीवाची बाजी लावून गुंडाशी दोन हात करते आणि सिद्धुला घरी परत घेऊन येते. तर जान्हवी जयंतला धडा शिकवण्याचा निर्णय घेते. अशातच आता झी मराठीने लक्ष्मी निवास मालिकेचे प्रोमो शेअर केले आहे. या प्रोमोमधील एक प्रोमोमध्ये समुद्रात उडी मारुन जान्हवी जयंतपासून सुटका करताना दिसतेय. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये भावना सिद्धूला मनातील गोष्ट सांगणार आहे.