

PRABHU SHELKE
ESAKAL
कलर्स मराठीवरील ''बिग बॉस मराठी ६' हा शो सध्या चांगलाच गाजतोय. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलंय. अशात घरात आता दुसरं एलिमिनेशन होणार आहे. घरातल्या प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. मात्र त्यातही घरातील एक सदस्य ज्याला पाहून सगळेच शॉक झाले होते. जेव्हा तो आला तेव्हा याला का घेतलं असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. हा स्पर्धक म्हणजे प्रभू शेळके. कुणीतरी एक गरीब घरातला मुलगा हवा म्हणून प्रभूला घेतलं का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आता शोचे क्रिएटिव्ह हेड केतन मानगावकर यांनी उत्तर दिलंय.