Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीची तब्येत बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Munawar Faruqui: मुनव्वरची तब्येत बिघडल्यानं त्याला 24 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Munawar Faruqui
Munawar Faruquisakal
Updated on

Munawar Faruqui: बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुनव्वरची तब्येत बिघडल्यानं त्याला 24 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुनव्वरच्या एका मित्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वर हा रुग्णालयातील बेडवर झोपलेला दिसत आहे. मुनव्वरचा रुग्णालयातील फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.

मुनव्वरचा मित्र नितीन मेंघानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मुनावर फारुकी हाताला सलाईन लावलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करुन मुनव्वरच्या मित्राने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "माझा भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी मी प्रार्थना करत आहे." मुनव्वरला नेमके काय झाले आहे? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

मुनव्वरच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "लवकर बरा हो" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "मुनव्वरला नेमकं काय झालंय?"

गेल्या महिन्यात मुनव्वरची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुनव्वरनं आयव्ही ड्रिप घेतल्याचा फोटोही शेअर केला होता. मुनव्वरनं काही दिवसांनंतर त्याच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. तो म्हणाला, तब्येतीचे अपडेट देताना त्याने सांगितले की, मी आता ठीक आहे. गेल्या महिन्यात मुनव्वर पोटात संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

'बिग बॉस 17' या कार्यक्रमानंतर मुनव्वर 'हलकी-हलकी सी' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला होता. या गाण्यात हिना खान देखील होती. तो लवकरच 'फर्स्ट कॉपी' मधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

Munawar Faruqui
VIDEO: मुनव्वर फारुकीनं घेतली सचिन तेंडुलकरची विकेट, स्टेडियममध्ये पसरली शांतता; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com