Bigg Boss 18: 'बिग बॉस 18'च्या विजेत्याला बक्षिस म्हणून लाखोंची रक्कम मिळणार? नक्की कोण मारणार बाजी?
Grand Finale: सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 18'चा फिनाले जवळ आला आहे. 19 जानेवारीला या शोचा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. शोमध्ये सध्या सहा फायनलिस्ट आहेत.
'बिग बॉस' हा सगळ्यात प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. दरवर्षी सलमान खान हा शो घेऊन येतात. जवळपास तीन महिने हा शो चालतो. 6 ऑक्टोबर 2024 ला 'बिग बॉस 18' च्या शोची सुरुवाती झाली होती. त्यानंतर 19 जानेवारीला सलमान विजेत्याचं नाव घोषित करणार आहे.