

Deepali Sayyed Unware Of Family Member Death
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीझन 6 चर्चेत आहे. काही स्पर्धकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या एका स्पर्धकाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही स्पर्धक आहे अभिनेत्री दीपाली सय्यद. दीपालीच्या कुटूंबातील सदस्याचं निधन झालं आहे. तिचा नवरा बॉबीने नुकतीच एका मुलाखतीत ही धक्कादायक माहिती उघड केली.