

bigg boss marathi 6 contestant
esakal
'बिग बॉस मराठी ६' सुरू होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. ४ दिवसात 'बिग बॉस मराठी ६' ची दारं उघडणार आहेत. अशात आता या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. त्यात अनेकांची नावं समोर आलीयेत. सागर कारंडे, सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे, संकेत पाठक, अनुश्री माने, दीपाली सय्यद, राधा मुंबईकर, रसिका जामसुदकर यासगळ्यांमध्ये आता आणखी दोन नावं घेतली जातात. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सीझनमध्ये दिसणार आहे.