बिग बॉस आता राखीची वाट लावणार! कन्फेशन रुममध्ये बोलावून हाताला खेचत बाहेर काढलं? घरात नक्की काय घडलं?

BIGG BOSS MARATHI: ACTION AGAINST RAKHI SAWANT?: बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे. घरात घाण केल्यामुळे नियमभंग झाल्याचं सांगत बिग बॉसने राखीला कन्फेशन रुममध्ये बोलावलं.
BIGG BOSS MARATHI: ACTION AGAINST RAKHI SAWANT?

BIGG BOSS MARATHI: ACTION AGAINST RAKHI SAWANT?

esakal

Updated on

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. बिग बॉसचा सहावा आठवडा सुरु होणार आहे. रविवारच्या भागात दोन धक्कादायक एलिमिनेशन्स पहायला मिळाले. आयुष संजीव यांची तब्येत ठिक नसल्यानं तो मागचा आठवडा खेळला नाही. त्यामुळे त्याला घराबाहेर जावं लागलं. तर सोशल मीडिया स्टार करण सोनावणे याचं अनपेक्षित एव्हिक्शन पहायला मिळालं. दोघे बाहेर गेल्यानंतर सचिन कुमावत आणि प्राजक्ता खुप भावूक झाले होते. आता घरात केवळ ११ सदस्य बाकी राहिले आहे. १२ वी सदस्य राखी सावंत आहे. परंतु ती काही दिवसांसाठी घरात आल्याचं बोललं जातय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com