Marathi Entertainment News : सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 सगळीकडे चर्चेत आहेत. घरातील खेळाडू, त्यांचं वागणं आणि एकूणच या रिअलिटी शोबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र मतं आहेत. त्यातच बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने बिग बॉस या शोवर टीका केली. त्या टीकेला त्याच सीजनची विजेती असलेल्या मेघा धाडेने सडेतोड उत्तर दिलं.