बॉबी देओलला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी! 'आश्रम ४'च्या शूटिंगचं ठिकाणच बदललं?

BOBBY DEOL AASHRAM 4 SHOOTING LOCATION CHANGE IN JAIPUR: बॉबी देओलच्या 'आश्रम ४' वेबसीरिजच्या चित्रीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. जयपूरमध्ये चाहत्यांच्या गर्दीमुळे शूटिंगच्या ठिकाणात बदल करून आमेर परिसरात चित्रीकरण करण्याचा पर्याय निवडल्याचे माहिती आहे.
BOBBY DEOL

BOBBY DEOL

Esakal

Updated on: 

AASHRAM FAME BOBBY DEOL FACES HUGE FAN CROWD DURING SHOOTING: अभिनेता बॉबी देओल याची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एखाद्या कलाकाराची लोकप्रियता त्याच्या चित्रपटांच्या किंवा वेबसीरिजच्या यशावरून मोजली जाते; मात्र, कधी कधी चाहत्यांची प्रचंड गर्दी चित्रीकरणाच्या वेळापत्रकावरही परिणाम करू शकते. अभिनेता बॉबी देओल याच्याबाबतीत सध्या असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे 'आश्रम' या बहुचर्चित वेबसीरिजच्या चौथ्या भागाच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांना ठिकाण बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com