अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चं नवीन गाणं रिलीज; बॉबी देओलची भूमिका चर्चेत

Anurag Kashyap Movie Song Out : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आगामी सिनेमा बंदरचं नवीन गाणं रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी.
अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चं नवीन गाणं रिलीज; बॉबी देओलची भूमिका चर्चेत
Updated on

Entertainment News : बॉबी देओल स्टारर ‘बंदर’ चित्रपटाची दुनिया प्रत्येक नवीन अपडेटसोबत अधिकच डार्क, अंगावर शहारे आणणारी आणि रंजक होत चालली आहे. आधी दमदार टीझरने आपल्या रॉ इमोशन्स, भीतीदायक अस्थिरता आणि अनपेक्षित पात्रांच्या वेगळ्या दुनियेची ओळख करून देत प्रचंड चर्चा निर्माण केली. त्यानंतर नुकताच ‘क्यूँ मज़ा आ रहा है’ हा ट्रॅक रिलीज झाला. आणि आता निर्मात्यांनी चित्रपटातील पुढचं गाणं ‘पिंजरा’ रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com