

७ जानेवारी २०२० मध्ये बॉलीवूडने एक उत्कृष्ट कलाकार गमावला. ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. त्याचा अभिनय हा अनेकांसाठी अभिनयाची मोठी शाळा होती. 'मदारी', 'मकबूल', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'हिंदी मिडीयम', 'अंग्रेजी मिडीयम' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा इरफान चाहत्यांचा लाडका होता. मात्र त्यांच्या अचानक मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला. ते कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का इगतपुरी मधील एका गावाला इरफानमुळे हिरोची वाडी म्हटलं जातं. तिथल्या गावकऱ्यांनी याबद्दल सांगितलं होतं.