RANBIR KAPOOR REACTS TO PAPARAZZI
esakal
VIRAL VIDEO RANBIR KAPOOR: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सुपरस्टार रणबीर कपूर हा त्यांच्या शांत स्वभावासाठी नेहमीच ओळखला जातो. अनेक वेळा चाहत्यांसोबत किंवा पापाराझींसोबत तो शांततेत वागताना, बोलताना पहायला मिळतो. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रणबीर पापाराझींवर भडकल्याचं पहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओची चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना पहायला मिळतेय.