#AllEyesOnRafa : बॉलिवूड उभं राहिलं पॅलेस्टाईनच्या समर्थनात; सोशल मीडियावर पोस्ट करत दाखवला पाठींबा

बॉलिवूड कलाकारांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात पोस्ट शेअर करत त्यांना पाठींबा दिला.
Alia Bhatt
Alia BhattEsakal

इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील सगळ्या बड्या सेलिब्रिटीजनंतर पॅलेस्टाईनला पाठींबा दर्शवला आहे. आलिया भट्ट, करीना कपूर आणि वरुण धवन या सेलिब्रिजनी सोशल मीडियावर पोस्ट करत पॅलेस्टाईनला पाठींबा दिलाय.

सोशल मीडियावर ‘#AllEyesOnRafah च्या पोस्ट त्यांनी शेअर केल्या आहेत. तसंच त्यांची नाराजी व्यक्त केलीये.

सेलिब्रिटीजनी केली सोशल मीडियावर पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने मंगळवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आणि @themotherhoodhomeला टॅग लिहिले की, ‘सगळी मुलं प्रेमास पात्र आहेत. सगळ्या मुलांना सुरक्षितता मिळायला हवी. सगळ्या मुलांना शांततेचं वातावरण मिळायला हवं. सगळ्या मुलांना सुरक्षित जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलांना त्या गोष्टी देण्यास सक्षम आहे.’

आलिया बरोबर तिची नणंद करीना कपूरनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. युनिसेफच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर असलेली पोस्ट रिशेअर केली. युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांनी राफामध्ये झालेल्या लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येचा निषेध या पोस्टमध्ये व्यक्त केला होता.

अभिनेता वरुण धवननेही इस्रायलच्या नव्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर ट्रेंड असलेला 'ऑल आईज ऑन राफा' हा टॅग आणि फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलाय. माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, फातिमा सना शेख, समंथा प्रभू, दिया मिर्झा आणि स्वरा भास्कर यांनीही याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

Alia Bhatt
Katrina & Alia working together : बंद केलेल्या प्रोजेक्टची पुन्हा सुरुवात; कतरीना, प्रियांका आणि आलिया दिसणार पहिल्यांदाच एकत्र

इस्राईल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष

इस्रायलने मंगळवारी केलेल्या गोळीबारात आणि हवाई हल्ल्यात गाझाच्या दक्षिणेकडील राफा शहराबाहेर रात्री तंबूत आश्रय घेत असलेल्या ३७ लोकांचा मृत्यू झालाय. पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने मंगळवारी सांगितले की, इस्रायलने ६ मेपासून राफावर केलेल्या हल्ल्यामुळे आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना शहर सोडून पळून जावे लागले आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात बहुतेक जण अनेकदा विस्थापित झाले होते. तात्पुरत्या तंबू छावण्या आणि युद्धग्रस्त भागात ही कुटुंबे विखुरली गेली आहेत.

Alia Bhatt
Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com