Investment Fraud: ओटीटी व्यवसायात चांगला फायदा होईल असे सांगून अभिनेत्रीला १ कोटी ६८ लाखांची फसवणूक
Bollywood Scam: बांगुरनगर पोलिसांनी एक सिने अभिनेत्री आणि तिच्या पतीला व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिल्म निर्माता शाम सुंदर डे आणि अन्य दोघांनी गुंतवणूकदारांच्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला.
अंधेरी : व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने एका सिने अभिनेत्रीसह तिच्या पतीची सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.