Urvashi Rautela: हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या उर्वशीला मिळाले 1 लाख गुलाब! 'ही कोणत्या जगात राहते?' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Urvashi Rautela in hospital for tiny finger injury: उर्वशीने हॉस्पिटलमधील आपला व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती गुलाबाच्या फुलांनी वेढलेली दिसत आहे.
Urvashi Rautela
Urvashi RautelaeSakal
Updated on: 

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या हाताच्या बोटाला छोटीशी जखम झाली आहे. यासंदर्भात तिने केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. उर्वशीने हॉस्पिटलमधील आपला व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती गुलाबाच्या फुलांनी वेढलेली दिसत आहे.

उर्वशीने दावा केलाय की, तिला जखम झाल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला तब्बल १ लाख गुलाबाची फुलं पाठवले आहेत. याच मुद्द्यावरून Reddit ने तिच्यावर टीका केली आहे. उर्वशी ही केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी तिचा हा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा सवाल Reddit ने केला आहे.

Loading content, please wait...