
Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर जितके महान अभिनेते आणि अभिनेत्री होऊन गेल्या तितकीच एक उत्तम दिग्दर्शकांची फळीही उभी राहिली. रोमँटिक सिनेमासाठी बॉलिवूड इंडस्ट्री प्रसिद्ध आहे. पण असे फार कमी दिग्दर्शक आहेत ज्यांनी उत्तम रोमँटिक सिनेमे बनवले. बॉलिवूडमधील रोमँटिक सिनेमाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे एक दिग्दर्शक एकेकाळी पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या विचारात होते.