Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Bollywood News: काही कलाकारांना एकापेक्षा जास्त व्हॅनिटी व्हॅन्स हव्या असतात तर काहींना पर्सनल स्टायलिस्ट पाहिजे असतो. अशातच एका कलाकारांवर किती खर्च केला जातो? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडत असेल.
Bollywood News
Bollywood Newsesakal

Bollywood News: 'बॉलिवूड इंडस्ट्री' (Bollywood News) या झगमगत्या जगाचं आकर्षण अनेकांना असतं. भारतातील मनोरंजनसृष्टीमध्ये कोट्यवधींचा व्यवहार होत असतो. चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तसेच त्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी, कोट्यवधींचा खर्च केला जातो. या चंदेरी जगाची भूरळ अनेकांना पडते. कोणताही बॉलिवूड कलाकार पाहिला, तर त्याच्या केसापासून ते त्याच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित असते. त्याच्या लूकवर अनेक स्टायलिस्ट काम करत असतात. तसेच त्या सेलिब्रिटीचा थाटही भलताच असतो. काहींना एकापेक्षा जास्त व्हॅनिटी व्हॅन्स हव्या असतात तर काहींना पर्सनल स्टायलिस्ट हवा असतो. अशातच एका कलाकारांवर किती खर्च केला जातो? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडत असेल. जाणून घेऊयात बॉलिवूड कलाकारांवर एका दिवसात होणाऱ्या खर्चाबद्दल...

Indianexpress.com नं चित्रपटाच्या पडद्यामागील गोष्ट जाणून घेण्यासाठी इंडस्ट्रीतील काही सोर्ससोबत संपर्क साधला यावेळी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान होणाऱ्या खर्चाबद्दल त्या सोर्सनं सांगितलं.

कलाकारांचा स्पॉट बॉय हा पर डे 25,000 रुपये घेतो, कलाकारांच्या सुरक्षेसाठी असणारे सिक्युरिटी गार्ड 15,000 रुपये घेतात, तर स्टायलिस्ट 1 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो. तसेच कलाकार व्हॅनिटी व्हॅन, फूड ट्रक आणि पर्सनल शेफची देखील मागणी करतात.

कलाकार व्हॅनिटी व्हॅन्सची करतात मागणी

एका सोर्सनं Indianexpress.com ला माहिती दिली की, चित्रपटाचे निर्माते कलाकारांना एक व्हॅनिटी व्हॅन देतात, पण काही कलाकार अनेक व्हॅनिटी व्हॅनची मागणी करत आहेत. सलमान खान आणि अजय देवगण यांच्याकडे दोन व्हॅनिटी व्हॅन आहेत. त्यामुळे इतर कलाकार त्यांच्याशी तुलना करतात पण हे स्टार्स अनेक दशकांपासून इंटस्ट्रीत आहेत आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर अनेक दशकांमध्ये आपली पावर दाखवली आहे.

एका कलाकारावर होतो एवढा खर्च

सोर्सनं पुढे सांगितलं की,"व्हॅनिटी व्हॅनचा दररोजचा खर्च 50,000 रुपये असतो. तसेच व्हॅनिटीमध्ये जनरेटर असतो, त्याचा वेगळा ड्रायव्हर असतो, त्यामुळे तो खर्चही असतो. काही अभिनेते फूड ट्रकची मागणी करतात, ज्यामध्ये शेफ देखील असतात. त्यामुळे तो खर्च देखील निर्मात्यांना करावा लागतो. एका कलाकाराचा दररोजचा खर्च जवळपास 20-22 लाख रुपये इतका असतो. जर एखाद्या चित्रपटाचे 70 दिवस शूटिंग सुरु असेल, तर एका कलाकारावर जवळपास 15-20 कोटी खर्च होतात. जे खर्च स्क्रिनवर कुठेही दिसत नाहीत. कारण हे सर्व खर्च पडद्यामागील आहेत."

Bollywood News
Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

कलाकारांच्या मानधनात होतीये वाढ

गेल्या काही दिवसांपासून कलाकारांच्या मानधनात वाढ होत असल्याचंही सोर्सनं सांगितलं. काही दिवसांपूर्वी Indianexpress.com सोबत बोलताना ट्रेड ॲनालिस्ट कोमल नाहटा यांनी सांगितलं की, अक्षय कुमारने बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी मानधन घेतलं तर टायगर श्रॉफने 35-40 कोटी रुपये फी घेतली. पण चित्रपटाने मात्र 60 कोटींचे कलेक्शन केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com