Kartik Aaryan: दाऊदला नडलेल्या 'या' डॉनच्या भूमिकेत चमकणार कार्तिक आर्यन

Hussain Ustara: आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर, समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक लवकरच विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Kartik Aaryan Hussain Ustara
Kartik Aaryan Hussain UstaraEsakal

Hussain Ustara New Movie Of Kartik Aaryan:

अभिनेता कार्तिक आर्यनची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे. गेल्या काही काळात दिलेल्या दमदार चित्रपटांनंतर अभिनेता कार्तिकच्या हाताला 2024 मध्ये अनेक मोठे चित्रपट लागले आहेत.

कार्तिक आर्यन सध्या अनीस बज्मीसोबत 'भूल भुलैया-3' या चित्रपटात काम करत आहे. तर कबीर खानचे दिग्दर्शित असलेल्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातही भूमिका साकारत आहे.

आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर, समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक लवकरच विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सिनेपत्रकार राहुल राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, साजिद नाडियादवाला यांची निर्मिती असलेल्या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज एकत्र येत आहेत.

आपल्या पोस्टमध्ये राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, कार्तिक आर्यन दाऊद इब्राहिमला नडलेल्या हुसैन उस्तरा याची भूमिका साकारणार आहे.

Kartik Aaryan Hussain Ustara
Allu Arjun : ‘मादाम तुसॉ’मध्ये अल्लू अर्जुनचा पुतळा

हा तोच प्रोजेक्ट आहे, जो विशाल भारद्वाज एकेकाळी दिवंगत अभिनेता इरफान खान आणि दीपिकाला सोबत घेऊन बनवत होते. दरम्यान, जुन्या स्क्रिप्टमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. आणि आता याची कथा हुसैन उस्तराच्या दृष्टीकोनातून दाखवली जाईल.

अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. मात्र सप्टेंबर 2024 मध्ये याचे चित्रिकरण सुरू होणार आहे.

Kartik Aaryan Hussain Ustara
Vikrant Messey : विक्रांत मेस्सीने हातावर काढला मुलाच्या नावाचा टॅटू

कार्तिक आर्यनचा लवकरच येणारा 'चंदू नहीं चॅम्पियन है में' हा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कार्तिक इंग्लंडचा अनुभवी फुटबॉलपटू हॅरी केनसोबत दिसला. कार्तिकने ओल्ड ट्रॅफर्ड फुटबॉल स्टेडियममध्ये फुटबॉलपटूसोबत संवाद साधत असलेल्या एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला आहे.

“चंदू नहीं चॅम्पियन है हम’ हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला आहे आणि 14 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे. यापूर्वी कार्तिक शेवटचा 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत दिसला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com