अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षीत छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. माहितीनुसार सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधीची कमाई झाली आहे. या चित्रपटाचा पहिलाच दिवस खास ठरणार आहे, कारण या चित्रपटाचे हजारो तिकीट अॅडव्हान्समध्ये बुक झालेले आहेत.