
Chhaava Marathi Movie Controversy : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. या धमाकेदार ट्रेलरची सध्या उलट सुलट चर्चा सुरु असताना यावरुनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी छत्रपती यांनी या सिनेमातील काही सिनेमॅटिक लिबर्टीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळं सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे.