
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात ८०० कोटी रुपयांचा गल्ला जमवत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२५ मधील सर्वाधिक कमावणाऱ्या चित्रपटात त्याचा पहिला क्रमांक आहे.