
भोपाल : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित 'छावा' सिनेमा मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याची बुधवारी एका जाहीर कार्यक्रमात याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त मी ही घोषणा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.