Chhava Movie: नेटफ्लिक्सवर लवकरच पाहता येणार 'छावा'?, 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट
OTT Platform Netflix: गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात हाऊसफुल्ल असलेला चित्रपट 'छावा' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येण्याची शक्यता आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.