Chinmay Mandlekar: "महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?

Chinmay Mandlekar: पुरस्कार सोहळ्यामध्ये चिन्मयनं भाषण केलं. त्याच्या या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
"महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नाव असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?
chinmay Mandlekaresakal

Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) त्याच्या ग़ालिब (Ghalib) या नाटकासाठी मोहन वाघ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये चिन्मयनं भाषण केलं. त्याच्या या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाला चिन्मय?

पुरस्कार सोहळ्यात केलेल्या भाषणात चिन्मय म्हणाला, "नाटकासाठी पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या नाटकाच्या टीमसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतात जन्माला आलेल्या मुलांच्या डीएनएमध्ये विशेषत: महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलाच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात. यामधील एक आहेत मंगेशकर, दुसरे आहेत बच्चन आणि तिसरे आहेत सराफ. "

पुढे चिन्मय म्हणाला," 'शिवकल्याण राजा' हे अगदी न कळत्या वयापासून कानावर ऐकू आलं. वयात आलो तेव्हा नमक हलाल हा पहिला चित्रपट पाहिला. 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट तर 100 वेळा पाहिला आहे. यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही या क्षेत्रात कसे? तर याचे उत्तर आमच्यातील मंगेशकर, बच्चन आणि सराफ या नावांचा असलेला डीएनए आहे."

पाहा व्हिडीओ:

"महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नाव असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?
Chinmay Mandlekar: "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून..."; मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

चिन्मय मांडलेकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.काही दिवसांपूर्वी चिन्मयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सांगितलं. तसेच चिन्मयनं या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल देखील सांगितलं.

चिन्मयनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच त्यानं वादळवाट,तू तिथे मी या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या ‎मोरया, झेंडा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

"महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नाव असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?
Chinmay Mandlekar: "ट्रोलर्समुळे तुझ्या करिअरचे निर्णय बदलू नकोस"; चिन्मयच्या निर्णयावर अवधूत गुप्तेनी दिला सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com