Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Court Denies Darshan’s Transfer to Ballari Jail : बळ्ळारी कारागृहात हलविण्याची मागणी फेटाळली; न्यायालयाने दिला कडक इशारा
Actor Darshan

Actor Darshan

esakal

Updated on

बंगळूर : चित्रदुर्ग रेणुकास्वामी हत्याकांडात (Chitradurga Renukaswamy Case ) पुन्हा कारागृहात असलेल्या अभिनेता दर्शनला (Actor Darshan) बळ्ळारी कारागृहात हलविण्यास मंगळवारी न्यायालयाने नकार दिला. मात्र, न्यायालयाने दर्शनच्या काही मागण्या पूर्ण करण्यासही सहमती दर्शविली. आरोपी दर्शनला पुन्हा बळ्ळारी कारागृहात हलवण्याची परवानगी मागणाऱ्या पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना ६४ व्या सत्र न्यायालयाने त्याला बळ्ळारी कारागृहात हलवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने विष देण्याची मागणी करत अश्रू ढाळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com