
Marathi Entertainment News : लावणीचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर येते ती नर्तिकांची मादक अदा, नृत्य आणि नखशिखांत शृंगार. आत्म्याला जणू परमात्म्याशी संवाद साधण्यास भाग पाडणारी कलाही एका लावणी किंग मध्ये अवगत आहे. हो बरोबर ओळखलंत. लावणी किंग म्हणून जगभरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. लावणीच्या दुनियेत स्वतःच हक्काचं स्थान आशिषने निर्माण केलं.