Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

फराहने नुकतंच एका मुलाखतीत ती सगळ्यात जास्त कोणाला घाबरते या गोष्टीचा खुलासा केला.
Farah Khan
Farah KhanEsakal

बॉलिवूडमधील आघाडीची कोरियोग्राफर असलेल्या फराह खानचा इंडस्ट्रीत दबदबा आहे. फनी अंदाजासोबत फराह तिच्या ओरडण्यासाठीही ओळखली जाते. लहान असो किंवा मोठा कोणताही कलाकार फराहच्या ओरडण्यापासून अजून वाचला नाहीये. सडेतोड बोलण्यासाठी ओळखली जाणारी फराह खऱ्या आयुष्यात कोणासमोर गप्प बसते याचा खुलासा नुकताच तिने एका मुलाखतीत केला.

फराहने नुकतीच अभिनेता अनिल कपूरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. यावेळी फराहने केलेल्या खुलास्याने सगळेचजण चकित झाले. यावेळी कपिलने तिला प्रश्न विचारला कि,"तुम्ही जेव्हा दिग्दर्शक म्हणून काम करता तेव्हा सगळ्यांना ओरडता पण खऱ्या आयुष्यात शिरीष तुमच्यावर कधी ओरडला आहे का?" यावर फराहने उत्तर दिलं कि,"माझ्यासाठी सगळं उलट आहे. शिरीष घराचा बॉस आहे. जेव्हा तो बाहेर असतो तेव्हा तो फारसा बोलत नाही पण तो घरात खूप बोलतो. त्याचं बोलणं ऐकावं लागू नये म्हणून आम्ही घरात बऱ्याचदा सोफ्यामागे लपतो. तो येतो आणि आम्हाला लेक्चर द्यायला सुरुवात करतो. म्हणून, मी माझ्या घरी खूप शांत असते."

तिच्या या खुलास्याने सगळ्यांना हसू अनावर झालं.

या आधीही फराहने शिरीषबाबत हा खुलासा केला होता. फराह भारती सिंह आणि हर्षच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती त्यावेळी ती म्हणाली होती कि,"शिरीष घरात खूप बडबड करतो. तो आम्हाला सगळ्यांना सतत लेक्चर देत असतो. माझी मुलं तर सतत त्याच्यापासून पळत असतात. मी स्वतःही त्याच्यापासून सतत लांब पळते."

फराह आणि शिरीषने २००४ साली लग्नगाठ बांधली. शिरीष हा लेखक, एडिटर,गीतकार आणि दिग्दर्शक आहे. त्याने जोकर, जाने-ए-मन या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

Farah Khan
Farah Khan : 'राजवर जर चित्रपट केला तर शिल्पा....' फराह खान काय बोलून गेली?

फराहने अनेक सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. यासोबतच 'में हूँ ना','ओम शांती ओम', 'तीस मार खान','हॅपी न्यू इयर' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय तिने कोरियोग्राफ केलेली अनेक गाणी गाजली आहेत. 'एक पल का जीना','मुन्नी बदनाम हुई','शीला कि जवानी', 'फेव्हिकॉल से','घागरा' ही तिने कोरियोग्राफ केलेली गाणी आजही अनेकांना आवडतात.

Farah Khan
Farah Khan Birthday : टॉपच्या कलाकारांना नाचवणारी फराह खान कधीकाळी स्वतःच होती बॅकग्राउंड डान्सर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com