arah Khan Birthday : टॉपच्या कलाकारांना नाचवणारी फराह खान कधीकाळी स्वतःच होती बॅकग्राउंड डान्सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farah Khan Birthday

Farah Khan Birthday : टॉपच्या कलाकारांना नाचवणारी फराह खान कधीकाळी स्वतःच होती बॅकग्राउंड डान्सर

Farah Khan Birthday : सध्याच्या टॉपच्या कोरिओग्राफर आणि दिग्दर्शकांपैकी एक असणारी फराह खान नेहमीच कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस खरी ठरली आहेत. फराह खान जशी आपल्या कोरिओग्राफीमुळे चर्चेत असते तशीच ती तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते.

फराहचा जन्म ९ जानेवारी १९६५ मध्ये मुंबईत झाला. फराह आज ज्या पोझिशनला आहे तिथे येण्यापर्यंत तिने बराच संघर्ष केला आहे. वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी तिने फार कष्ट घेतले आहेत. यासाठी तिने कुटुंबाच्या मदतीने डान्स करिअरला सुरूवात केली. त्यासाठी तिने पहिले कलाकारांच्या मागे नाचणाऱ्या कलाकारांमध्ये डान्स करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Farah Khan : कोण आहेत त्या 'झिंगाट' अभिनेत्री? फराहची खास पोस्ट

फराह खानचे वडिल कमरान खान हे त्यावेळी अभिनेता आणि निर्माता म्हणून काम करायचे. त्यांनी एक सिनेमा बनवला तो फ्लॉप झाला आणि ते कर्जात बुडाले. या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी घरातले दागिने, महागडे सामान विकले पण तरीही अडचणी काही कमी झाल्या नाहीत. काही काळाने त्यांचं निधन झालं आणि सगळी जबाबदारी फराह वर आली.

फराह खानला नृत्याची आवड होती. ती मायकल जॅक्सनची फॅन होती. मायकल जॅक्सनचं थ्रिलर गाणं आलं त्यावेळी त्याचे मुव्हज बघून फराहने डान्स शिकयचं ठरवलं. त्यावेळी फारहच्या घरी डान्स शिकण्याची सोय नव्हती म्हणून ती शेजाऱ्यांच्या टी. व्ही. वर डान्स बघून शिकत होती. आणि तिच्या मेहनतीचं फळ आज तिला मिळालं.

फराह बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करताना कलाकारांना नव्य मुव्हज पण शिकवत होती. जो जिता वही सिकंदर सिनेमात सरोज खानची असिस्टंट डान्सर होती. अचानक सरोज खान त्यातून बाहेर पडल्याने फराह ने पेहला नशा हे गाणं कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. इथूनच तिच्या करिअरची खरी सुरुवात झाली.

फराह ने २००४ मध्ये वयाने ९ वर्ष लहान चित्रपट निर्माता शिरीष कुंदरशी लग्न केलं. तिला दोन मुली १ मुलगा असून हे तिळं झाले होते. फराहने आजवर १०० पेक्षा जास्त हिट गोण्यांची कोरिओग्राफी केली आहे.