Zaira Wasim : 'दंगल' गर्ल झायराच्या वडिलांचं निधन ; "माझे वडील..." म्हणत सोशल मीडियावर भावूक पोस्ट

Zaira Wasim : अभिनेत्री झायरा वसीमच्या वडिलांचं निधन झालं असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी सांगितली.
Zaira Wasim
Zaira WasimEsakal

'दंगल' सिनेमामुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री झायरा वसीमच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली.

गेला काही काळ झायरा सिनेविश्वपासून दूर असून तिचे अनेक सिनेमे खूप गाजले.

झायराची पोस्ट:

"डोळे खरेच अश्रू ढाळतात आणि हृदय दु:खी होते, परंतु आपल्या प्रभूला जे आवडते त्याशिवाय आम्ही बोलणार नाही."

माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि अल्लाहला त्याच्या उणीवा माफ करण्यास सांगा, त्यांना शांती मिळूदेत, त्यांना त्यांच्या यातनापासून वाचवा, येथून पुढे त्याचा प्रवास सुलभ करा.

त्यांना सहज हिशोबासाठी बोलावले जावे आणि त्यांना जन्ना आणि मगरीराहची सर्वोच्च पातळी दिली जावी.

खरंच, आम्ही अल्लाहचे आहोत आणि खरंच, आम्ही त्याच्याकडे परत जाऊ."

झायराच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि झायराचे सांत्वन केलं.

झायराची कारकीर्द:

दंगल सिनेमातून झायराने सिनेविश्वात पदार्पण केलं. या सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. या सिनेमात पैलवान गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

तिच्या वडिलांना राष्ट्रीय पुरस्काराबाबत फारशी माहिती नव्हती. हा किती मोठा पुरस्कार आहे हे त्यांना माहीत नव्हतं. आपल्या वडिलांना दोन तास बसवून तिने या पुरस्काराबाबत समजावून सांगितलं होतं. झायराला जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा तिचे आई – वडील तिथे उपस्थित होते आणि तिला तिच्या पालकांसमोर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा अभिमान वाटतो, असं तिने पिंकव्हीलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

त्यानंतर झायराने 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'द स्काय इज पिंक' या सिनेमात काम केलं. तिचे हे दोन्ही सिनेमे गाजले. 'द स्काय इज पिंक' या सिनेमात तिने फरहान खान, प्रियांका चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

Zaira Wasim
Farhan Akhtar Birthday: लग्नाच्या 17 वर्षांनी घेतला घटस्फोट अन् शिबानी दांडेकर सोबत अडकला लग्नबंधनात

सिनेविश्वाला रामराम

फक्त तीन सिनेमात काम केल्यानंतर झायराने सिनेविश्वाला रामराम केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही बातमी शेअर केली. तिने निवडलेलं करिअर तिच्या धार्मिक मूल्यांशी मेळ खात नाही असं तिचं म्हणणं होतं.

यानंतर झायरा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या धर्माशी संबंधित पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते पण वैयक्तिक आयुष्याबद्दल ती फार कमी व्यक्त होते.

Zaira Wasim
Zaira Wasim: चेहऱ्यावर बुरखा असणं हे.. दंगल फेम झायरा वासिमचं रोखठोक वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com