तेलुगू चित्रपट 'रॉबिनहूड' 28 मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच क्रिकेट जगतात भुकंप आला आहे. कारण या चित्रपटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर सुद्धा अभिनय करताना दिसून आलाय. याआधी वॉर्नरने पुष्पावर केलेलं रील प्रचंड व्हायरल झालं होतं. आता त्यात त्याचा रॉबिनहूड चित्रपटातील सीन व्हायरल होत आहे. या चित्रपटात वॉर्नरला 'डेविड भाई' नावाने हाक मारली आहे. जो पेशाचे गॅंगस्टर आहे.