

deepika padukone second daughter name
esakal
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना काही दिवसांपूर्वी दुसरं कन्यारत्न झालं. त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीचं नाव दसऱ्यादिवशी जाहीर केलं. आता कलाकार असोत किंवा इतर लोक आपल्या मुलांची युनिक नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आपल्या पाल्याचं नाव इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे असं बघितलं जातं. मात्र दीपिकाने तिच्या मुलींची नावं अगदी साधी पण अर्थपूर्ण ठेवली आहेत. मात्र तिच्या दोन्ही मुलींची नावं ठेवल्यावर चर्चा होणार नाही असं होऊच शकत नाही. यापूर्वी अभिनेत्रीच्या पहिल्या मुलीचं नाव ठेवल्यावर बराच गदारोळ माजला होता. आता दुसऱ्या मुलीच्या नावाच्या वेळेस तिने हे नाव कॉपी केल्याचं बोललं जातंय.