रणवीर- दीपिकाच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार; छोटीशी दुवा ताई होणार, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

DEEPIKA-PADUKONE-RANVEER-SINGH-SECOND-BABY-NEWS: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिलीये.
DEEPIKA PADUKONE SECOND PREGANANCY

DEEPIKA PADUKONE SECOND PREGANANCY

ESAKAL

Updated on

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी चाहत्यांना पुन्हा एकदा आनंदाचा धक्का दिलाय. सध्या रणवीर त्याच्या 'धुरंधर' सिनेमाच्या यशाचं सेलिब्रेशन करत असतानाच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असून तिने स्वतः सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com