DEOOL BAND 2
esakal
DEOOL BAND 2 CROSSES 40 CRORE: प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला देऊळ बंद २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतोय. या सिनेमात ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आलीय. मोहन जोशी या सिनेमात स्वामींच्या भूमिकेत आहेत, तर स्नेहल तरडे हिने शेतकऱ्याच्या बायकोची भूमिका साकारली आहे. सध्या सगळीकडे याच सिनेमाची चर्चा सुरु आहे. या सिनेमानं आतापर्यंत ४० कोटी रुपयांचा गल्ला कमवला आहे.