'देऊळ बंद'च्या त्या सीननंतर गश्मीरसोबत ४ दिवस बोलत नव्हती ऑनस्क्रीन लेक; कारण सांगत म्हणाली-

GASHMEER MAHAJANI ONSCREEN DAUGHTER IN DEOOL BAND: गश्मीर महाजनी याच्यावर त्याची 'देऊळ बंद' चित्रपटातली लेक रागावली होती. तब्बल ४ दिवस ती अभिनेत्यासोबत बोलत नव्हती.
aarya ghare on gashmeer mahajani

aarya ghare on gashmeer mahajani

esakal

Updated on

सध्या प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत येण्यास भाग पाडलं. या चित्रपटाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. त्यांच्या 'देऊळबंद' या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी याने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गश्मीरची ऑनस्क्रीन लेक त्याच्याशी चार दिवस बोलत नव्हती. आता एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com