

bollywood actor cheated his wife
ESAKAL
BOLLYWOOD ACTOR CHEATED HIS WIFE: इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक घटस्फोट होताना दिसतायत. त्यामागचं मुख्य कारण असतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. पडद्यावर अगदी परफेक्ट दिसणारं कपल खऱ्या आयुष्यातही तसंच असेल असं सांगता येत नाही. कलाकारांनी आपल्या पार्टनरला फसवल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आलीये. जी एका टॉपच्या अभिनेत्याबद्दल आहे. महत्वाचं म्हणजे या अभिनेत्याच्या मागे त्याच्याच पत्नीने गुप्तहेर लावली होती आणि तिने जे खुलासे केले ते ऐकून त्याची पत्नीही चकीत झाली. ही डिटेक्टिव्ह आहे तान्या पुरी. या अभिनेत्याने अनेक वर्ष आपल्या पत्नीला हातदेखील लावलेला नाही मात्र बाहेर तो मुलींसोबत नको ते करतो. महत्वाचं म्हणजे तो दोन मुलांचा बाप आहे.