Devoleena Bhattacharjee Sparks Pregnancy Rumors with Navratri Post
esakal
Devoleena Bhattacharjee: 'साथ निभाना साथिया या मालिकेतून घराघरात पोहचलेली गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा चर्चेत आली आहे. ९ महिन्यापूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर आता तिने पुन्हा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका हातात दिवा तर दुसरा हात पोटावर ठेवत फोटो काढलाय. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप सुद्धा दिसत आहे. त्यामुळे देवोलिना पुन्हा प्रेग्नेट आहे का? अशा चर्चा रंगताना पहायला मिळतय.